एसटी बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोठी खुशखबर! सरकारची नवी सुविधा सुरू
नमस्कार मित्रांनो, अनेकदा एसटी बस उशिरा येणे, मध्येच रद्द होणे किंवा वेळेत माहिती न मिळाल्याने विद्यार्थ्यांना स्टँडवर तासनतास थांबावे लागते. यामुळे शाळा, कॉलेज किंवा परीक्षेला उशिर होत असतो. ST Bus Helpline 2025
या समस्यांवर उपाय म्हणून सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आता एसटी वेळेत आली नाही, रद्द झाली किंवा काही अडचण आली तर विद्यार्थ्यांना थेट हेल्पलाइनवरून मदत मिळणार आहे.
हे सुद्धा वाचा - लाडकी बहीण योजना: ई-KYC नियमात मोठा बदल, पती/वडिलांच्या अनुपस्थितीत मिळणार विशेष सूट
विद्यार्थ्यांसाठी एसटीचा खास हेल्पलाइन नंबर
एसटी महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी 1800221251 हा विशेष हेल्पलाइन नंबर सुरू केला आहे.
या नंबरवर विद्यार्थ्यांना खालील तक्रारी नोंदवता येतील:
- बस उशिरा येणे
- बस रद्द होणे
- चुकीचे फेऱ्यांचे नियोजन
- बस न मिळाल्याने शाळेला/परीक्षेला उशिर
मुख्याध्यापक किंवा विभाग नियंत्रकांद्वारेही समस्या नोंदवता येणार आहे.
हे सुद्धा वाचा - घरबसल्या बनवा आयुष्मान कार्ड! ५ लाखांपर्यंत उपचार मोफत
कडक नियम आणि जबाबदारी ठरवली
शाळा सुटण्याच्या वेळेत (सोमवार–शुक्रवार संध्याकाळी 5 ते 6 दरम्यान):
- संबंधित आगार पर्यवेक्षकांनी स्वतः बसथांब्यावर उपस्थित राहून वाहतूक नियोजन करावे.
- शेवटचा विद्यार्थी घरी पोहोचेपर्यंत पर्यवेक्षक जागेवरच थांबणे बंधनकारक.
- बसच्या चुकीच्या व्यवस्थापनामुळे विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान झाले तर संबंधित अधिकारी/पर्यवेक्षकांवर कारवाई आणि तत्काळ निलंबन होऊ शकते.
हे सुद्धा वाचा - शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये मिळणार; नाव यादीत आहे का तपासा
विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध सवलती
- शालेय विद्यार्थ्यांना मासिक पासवर 66.66% सूट
- बारावीपर्यंतच्या मुलींना मोफत पास सुविधा
- उशिराने बस आल्यास पालकांची काळजी कमी करण्यासाठी हेल्पलाइन उपयुक्त
ही सेवा विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांचा वेळ वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे.
ST-Bus Time Table – आपल्या जवळच्या एसटी बसचे वेळापत्रक पाहा
आपल्या गावातून किंवा शहरातून एसटी बस कधी सुटते, कुठे थांबते आणि किती वाजता पोहोचते याची संपूर्ण माहिती तुम्ही आता ऑनलाइन पाहू शकता. ST Bus Time Table वर क्लिक करून रूट, वेळा, बस प्रकार आणि लाइव्ह अपडेट्स सहज तपासा. प्रवासाच्या आधी वेळापत्रक पाहिल्याने तुमची वेळ वाचते आणि प्रवास अधिक सोयीस्कर होतो.
ST Bus Time Table पाहण्यासाठी येथे क्लिक करा
Article End Here
Go To Home
अश्याच न्यूज पाहणायसाठी इथे क्लिक करा