लाडकी बहीण योजना त मोठा बदल! पती किंवा वडिलांच्या अनुपस्थितीत महिलांना ई-KYC मधून विशेष सूट
लाडकी बहीण योजना चा लाभ घेणाऱ्या आणि पती किंवा वडिलांचे निधन झाल्यामुळे अडचणीत असलेल्या महिलांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. ई-KYC प्रक्रियेदरम्यान पती किंवा वडिलांचे आधार कार्ड आवश्यक असल्याने अनेक महिलांचे प्रमाणीकरण पूर्ण न होता पुढील हप्ता मिळण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली होती.
हे सुद्धा वाचा : लाडकी बहीण योजना नोव्हेंबर-डिसेंबर हप्ता: ३००० रुपये एकत्र येणार? अधिकृत माहिती!
या अडथळ्यांवर तोडगा काढत महिला व बालकल्याण विभागाने विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. यानुसार पती किंवा वडिलांचा आधार क्रमांक नसलेल्या महिलांना आता मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोटाचे प्रमाणपत्र किंवा न्यायालयीन आदेश सादर करून ई-KYC मधील जाचक अटीतून सूट मिळणार आहे.
▶ 31 डिसेंबरपर्यंत ई-KYC अनिवार्य– लाडकी बहीण योजना
योजनेत पारदर्शकता राखण्यासाठी सरकारने सर्व लाभार्थी महिलांसाठी ३१ डिसेंबरपर्यंत ई-KYC पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, पती/वडील नसलेल्या किंवा घटस्फोटीत महिलांना यापुढे आधार क्रमांकाचा अडथळा येणार नाही.
हे सुद्धा वाचा : कृषी समृद्धी योजना २०२५: अहिल्यानगर जिल्ह्यात शेतकऱ्यांसाठी ९०% अनुदान! १२ योजनांची संपूर्ण माहिती
▶ नवीन प्रक्रिया कशी असणार? – लाडकी बहीण योजना
सरकारने जाहीर केलेल्या सुधारित प्रक्रियेप्रमाणे:
- लाभार्थी महिलेने सर्वप्रथम स्वतःची ई-KYC पूर्ण करणे आवश्यक.
- त्यानंतर पती किंवा वडिलांचे अधिकृत मृत्यू प्रमाणपत्र, घटस्फोट आदेश किंवा न्यायालयीन दस्तऐवज संबंधित अंगणवाडी सेविकेकडे ३१ डिसेंबरपूर्वी जमा करणे.
- सेविका कागदपत्रांची पडताळणी करून ती माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याकडे पाठवतील.
- अंतिम मंजुरी जिल्हा महिला व बाल विकास अधिकाऱ्यांकडून मिळेल.
- मंजुरीनंतर महिलेच्या नावे ई-KYC सूट अधिकृतरित्या नोंदवली जाईल.
महिला व बालकल्याण विभागाच्या माहितीनुसार, या निर्णयामुळे पती/वडील नसलेल्या हजारो महिलांना दिलासा मिळणार आहे आणि योजनेचा लाभ नियमितपणे मिळण्यास मदत होणार आहे.
लाडकी बहीण योजनेची ई-KYC सुरू; येथे आहे अधिकृत लिंक
महाराष्ट्र सरकारच्या माझी लाडकी बहीण योजने अंतर्गत ई-KYC प्रक्रिया सुरू झाली आहे. लाभार्थींनी अधिकृत पोर्टलला भेट देऊन आपली माहिती पडताळणे बंधनकारक आहे. अधिकृत वेबसाइटवर सर्व सूचना, पात्रता, कागदपत्रांची माहिती उपलब्ध आहे. खाली दिलेल्या लिंकवर जाऊन आपली ई-KYC प्रक्रिया त्वरित पूर्ण करा आणि पुढील हप्ता वेळेत मिळवा.
👉 अधिकृत ई-KYC लिंक:
https://ladkibahin.maharashtra.gov.in
(गुगलवरील फेक साइट्सपासून सावध रहा. हीच सरकारची अंतिम अधिकृत वेबसाइट आहे.)
News End Here
अश्याच न्यूज पाहणायसाठी इथे क्लिक करा
Go To Home