शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये मिळणार; नाव यादीत आहे का तपासा- compensation

Facebook
Reddit
Twitter
LinkedIn
Pinterest
WhatsApp
Compensation

शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये जमा होणार – Compensation

Compensation महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांचे यंदाच्या खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सततच्या पावसामुळे, हवामानातील अनिश्चिततेमुळे आणि रोग-किडीच्या प्रादुर्भावामुळे पिकांचे मोठे नुकसान झाल्याने राज्य सरकारने मदत पॅकेजची घोषणा केली आहे. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांना हेक्टरी 17,000 रुपये एवढी नुकसानभरपाई देण्यात येणार आहे.

मात्र शेतकऱ्यांना असे वाटत आहे की 100 टक्के नुकसान असूनही हेक्टरी फक्त 17 हजार रुपये मिळणे हा अन्याय आहे. त्यामुळे ही रक्कम खात्यात नेमकी कधी जमा होणार, याबाबतही सर्वसामान्य शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे.

या वर्षी सरकारने पीक विम्यात “उंबरठा उत्पादन” (Threshold Yield) सूत्र लागू केले आहे. त्यामुळे कोणाला किती नुकसानभरपाई मिळेल याबाबत कृषी विभाग किंवा विमा कंपनी दोघांकडूनही स्पष्ट माहिती मिळत नाही. ज्यांनी पीकविमा भरला आहे त्यांनाच ही भरपाई मिळणार असली तरी ती रक्कम तुटपुंजी राहणार असल्याची शक्यता आहे.

कृषी विभागाच्या माहितीनुसार:

  • सोयाबीन, मका आणि इतर खरीप पिकांची आकडेवारी 31 जानेवारीपर्यंत सादर केली जाते.
  • तूर आणि कांद्याची आकडेवारी 31 मार्चपर्यंत विमा कंपन्यांकडे दिली जाते.

त्यामुळे खरीप हंगामातील प्रमुख पिकांची नुकसानभरपाई फेब्रुवारी २०२५ महिना उजाडण्याची शक्यता आहे.

या वर्षीच्या खरीप विमा योजनेत बाजरी, नाचणी (रागी), मका, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग, तीळ, कारळे, कापूस आणि कांदा या पिकांचा समावेश होता. सर्व पिकांसाठी जोखीम पातळी 70% होती.

शेतकऱ्यांनी आपल्या जिल्ह्यानुसार लाभार्थी यादी वेळोवेळी तपासत राहणे आवश्यक आहे, जेणेकरून खात्यात रक्कम जमा झाल्याची पुष्टी करता येईल.

Latest News

Latest Web Stories

धर्म और संस्कृति

राजनीति

Select Category