नमो शेतकरी योजना
नमो शेतकरी योजना : नमो शेतकरी सन्मान निधी योजनेचा लाभ घेणाऱ्या राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या योजनेतील वार्षिक आर्थिक मदत वाढवण्याची घोषणा केली होती. मात्र, या वाढीची अंमलबजावणी सध्या अडचणीत अडकल्याचे स्पष्ट होत आहे.
हे सुद्धा वाचा – लाडकी बहीण योजना: ई-KYC नियमात मोठा बदल, पती/वडिलांच्या अनुपस्थितीत मिळणार विशेष सूट
नमो शेतकरी योजना (Namo Farmer) ही केंद्र सरकारच्या पीएम किसान (PM Kisan Yojana) योजनेंच्या धर्तीवर सुरू करण्यात आली आहे. सध्या या दोन्ही योजनांमधून शेतकऱ्याला वर्षाकाठी ६,००० रुपये मिळतात. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मदत वाढवून ती ९,००० रुपये वार्षिक करण्याची घोषणा केली होती. यामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.
हे सुद्धा वाचा – घरबसल्या बनवा आयुष्मान कार्ड! ५ लाखांपर्यंत उपचार मोफत
मात्र, या वाढीव मदतीसाठी सरकारला जवळपास ३,००० कोटी रुपयांची अतिरिक्त तरतूद करावी लागणार आहे. नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात या निधीची कोणतीही तरतूद न झाल्याने या घोषणेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे” राजकोशावर वाढलेला ताण हेही एक कारण असू शकते, अशी चर्चा आहे.
हे सुद्धा वाचा – शेतकऱ्यांना हेक्टरी 17 हजार रुपये मिळणार; नाव यादीत आहे का तपासा
यासोबतच या योजनेसाठी ‘ॲग्रीस्टॉक’ (Agristock) शेतकरी ओळखपत्र बंधनकारक करण्याचीही शक्यता आहे. केंद्र सरकारने पीएम किसान योजनेसाठी हे ओळखपत्र अनिवार्य केले आहे. त्याच धर्तीवर, राज्य सरकारदेखील नमो शेतकरी योजनेत अशा प्रकारची अधिसूचना लवकरच जारी करू शकते. त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले शेतकरी ओळखपत्र तयार ठेवावे, असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.
अधिक माहितीसाठी अधिकृत नमो शेतकरी वेबसाइटला भेट द्या
नमो शेतकरी सन्मान निधी योजनेबद्दलची सर्व अधिकृत माहिती, लाभार्थी स्थिती (Beneficiary Status), हप्त्याच्या तारखा, नोंदणी प्रक्रिया आणि नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी राज्य सरकारची अधिकृत वेबसाइट भेट द्या. अधिकृत दुवा खाली दिला आहे:
https://nsmny.mahait.org/
News End Here
Go To Home
Maharashtra News Click Here