Beed राजकारणातील प्रभावशाली घराणं: क्षीरसागर कुटुंबाचा प्रवास

Share This News On Social Platforms ⬇️

Facebook
Reddit
Twitter
LinkedIn
Pinterest
WhatsApp
beed

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा सध्या सर्वत्र उडालेला आहे. Beed जिल्ह्यातही निवडणुकांच्या तयारीला वेग आला आहे. अशा वेळी चर्चेत येणारी काही घराणी राजकारणावरच्या प्रभावामुळे कायम चर्चेत असतात. त्यापैकी एक म्हणजे क्षीरसागर कुटुंब, ज्यांनी दशकानुदशके बीडच्या राजकारणावर वर्चस्व टिकवून ठेवले आहे.

आजपासून सुमारे पन्नास वर्षांपूर्वीचा काळ आठवला तर समाजात स्त्रियांचा राजकारणात सहभाग जवळजवळ अस्तित्वात नव्हता. अशा काळात Kesarbai Kshirsagar यांनी राजकारणात पदार्पण करून समाजातील प्रचलित रूढींना धक्का दिला. कर्नाटकातील माहेर आणि सोनाजीराव क्षीरसागर यांच्याशी विवाहानंतर बीडमध्ये स्थायिक झालेल्या केशरबाईंना सोनाजीरावांनीच राजकारणात उतरायला प्रोत्साहन दिलं.
त्यांचा पाठिंबा आणि केशरबाईंचा आत्मविश्वास यामुळे त्या राजकारणात स्थिरावल्यानंतर नावाजल्या जाऊ लागल्या. “केशरबाई” सर्वांच्या “केशर काकू” झाल्या.

केशर काकू क्षीरसागरचा Beed राजकीय प्रवास

राजुरी गावाच्या सरपंच

1967 — पंचायत समिती अध्यक्ष

1972 — चौसाळा येथून काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर महाराष्ट्र विधानसभेत प्रवेश

विविध सार्वजनिक उपक्रम समित्यांवर काम

बीडच्या तीन वेळा खासदार

त्यांच्या कार्यकाळात काँग्रेस पक्षासाठी मोठं योगदान तर होतंच, पण तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधींशी असलेले सलोख्याचे संबंध हेही राजकीय कारकिर्दीचं ठळक वैशिष्ट्य होतं. या साऱ्या प्रवासामुळे बीडच्या राजकारणाचं केंद्र क्षीरसागर कुटुंब बनलं आणि त्याची पायाभरणी केशर काकूंनी केली.



केशर काकूंचा राजकीय वारसा

कुटुंबाची पुढची पिढी सुद्धा राजकारणात उतरली आणि केशर काकूंचा राजकीय वारसा पुढे नेला. केशर काकूंनंतर त्यांच्या तीन मुलांनीही राजकारणात सक्रिय प्रवेश केला.

त्यांची नवे व त्यांनी भूषवलेली पदे पुढीलप्रमाणे:

Jaydutt Kshirsagar — बीड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती, चार वेळा आमदार, तसेच राज्यमंत्री

Ravindra kshirsagar — गजानन साखर कारखाना चेअरमन, जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य

डॉ. भारतभूषण क्षीरसागर — बीड नगरपरिषदेचे तब्बल 35 वर्ष नगराध्यक्ष

तर सध्याच्या राजकारणाचा विचार केला तर या घराण्याची तिसरी पिढी सक्रिय राजकारणात आहे.

Sandip Kshirsagar — विद्यमान आमदार, तसेच पंचायत समिती, जिल्हा परिषदेत विविध पदांवर काम

Dr. Yogesh Kshirsagar — माजी नगरपरिषद सदस्य

Hemant Kshirsagar — नगरपरिषद उपाध्यक्ष व सदस्य

केशर काकूंच्या जाण्यानंतर त्यांच्या नंतरच्या पिढ्यांचा राजकारणात सक्रिय सहभाग होता. परिणामी विधानसभा, नगरपरिषद, जिल्हा परिषद अशा विविध स्तरांवर क्षीरसागर कुटुंबाची पकड कायम राहिली आहे.



मतभेद असूनही नात्यांचा गंध कायम!

कुटुंब कितीही मोठं असलं तरी मतभेद अपरिहार्य असतात. क्षीरसागर कुटुंबातही राजकीय मतभेदांमुळे वेगवेगळ्या पक्षांच्या झेंड्याखाली काम करणारे सदस्य दिसतात. तरीही कुटुंबातील नात्यांमध्ये दुरावा निर्माण झालेला नाही.
आजही Beed शहरातील नगर रोडवरील क्षीरसागर कुटुंबाचा बंगला हाच चार भावांचे संपूर्ण कुटुंब एकत्र राहण्याचा पत्ता आहे. यावरून स्पष्ट होतं की राजकारण घरापर्यंत पोहोचलेलं नाही.

निवडणुकांचा मोसम आणि पुन्हा चर्चेत आलेलं घराणं

सध्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वातावरण तापलेलं असताना क्षीरसागर कुटुंब पुन्हा चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे.
केशर काकूंनी सुरू केलेल्या प्रवासातून आज तिसरी पिढी राजकारणात सक्रिय आहे आणि या घराण्याचा प्रभाव अद्यापही अबाधित.


Explore All Categories ⬇️

LATEST UPDATES
Join WhatsApp Group