हिवाळ्यात कोणती फळे खावीत आणि कोणती टाळावीत | Best Winter Fruits

Share This News On Social Platforms ⬇️

Facebook
Reddit
Twitter
LinkedIn
Pinterest
WhatsApp
fruits

हिवाळ्यात fruits and vegetables दोन्ही गोष्टींची आवक चांगली वाढलेली असते. हिवाळ्यात त्यांचे सेवन करणे आरोग्यासाठी हितकारक सुद्धा मानले जाते. पण हिवाळ्यात काही fruits खाताना आपल्याला खबरदारी घेणे आवश्यक आहे, किंबहुना काही फळांचं सेवन हिवाळ्यात न केलेलंच उत्तम मानलं जात. याच फळांबद्दल जाणून घेऊयात आजच्या या लेखातून!

fruits

हिवाळ्यात कोणती Fruits खाऊ नये ?

अननस :


पिवळा धमक रंग व आंबट-गोड चवीसाठी ओळखला जाणारा अननस अनेकांना आवडतो, पण थंडीत जेव्हा सर्दी व खोकला होण्याची शक्यता सर्वाधिक असते, अश्या वातावरणात अननसाचे सेवन करणं कमी करण्याचा किंवा शक्य असल्यास टाळण्याचा सल्ला दिला जातो. थंडीत जास्त प्रमाणात अननस सेवन केल्यामुळे immune system वर तर त्याचा परिणाम तर होऊ शकतोच पण त्यामुळे ऍलर्जी, तोंड येणे किंवा घसा खवखवणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात.

खरबूज :


खरबूज शरीराला थंड करणारे फळ आहे. पण हिवाळ्याच्या थंड वातावरणात आपल्याला शरीरात उष्णता वाढवणारे पदार्थ खाण्याची गरज असते. त्यामुळे हिवाळ्यात खरबूज खाणे टाळावे असा सल्ला देण्यात येतो. ज्यामागील कारण समजून घ्यायचं झालं तर हिवाळ्यात पचनशक्ती कमी असल्याने हे फळ पचायला जड जाते आणि श्लेष्मा वाढवू शकते, ज्यामुळे सर्दीचा त्रास वाढण्याची शक्यता असते.

केळी :


केळी वर्षभर उपलब्ध असले तरी हिवाळ्यात ते टाळण्याचा सल्ला दिला जातो. कारण थंड हवेत केळी mucus वाढवतात. हिवाळ्यात सकाळी केळी खाल्ल्यावर जडपणा येण्याची अर्थात bloating ची तक्रारही अनेकांना होते. म्हणून हिवाळ्यात केळीचे सेवन मर्यादित ठेवणे योग्य असल्याचं बोललं जात.

कलिंगड :


तसं तर कलिंगड हे उन्हाळ्यात खाल्लं जातं, पण आजकाल वर्षाचे बाराही महिने कलिंगड उपलब्ध असल्याने त्याचे सेवन केले जाते. पण जर थंडीत त्याचे सेवन केले तर शरीराचे तापमान आणखी कमी होते आणि सर्दी तसेच घसा दुखण्याची शक्यता वाढते. म्हणून मात्र हिवाळ्यात कलिंगड खाण कटाक्षाने टाळण्याचा सल्ला दिला जातो. कलिंगड अत्यंत थंडावा देणारे फळ आहे.

द्राक्षे :


द्राक्षे मुलतः थंड प्रकृतीची असतात. त्यामुळे खोकला-सर्दी वाढण्याची शक्यता असते. शिवाय त्यात असलेले साखरेचे प्रमाण जास्त आरोग्यासाठी चांगले नसते.


Also See

Immunity Boosting Ladoo Recipe | स्वादिष्ट आणि पौष्टिक घरगुती लाडू
Immunity Boosting Ladoo Recipe | स्वादिष्ट आणि पौष्टिक घरगुती लाडू
By Live News India
एकच काढा, चार उपाय! Home Remedy For Period Pain
एकच काढा, चार उपाय! Home Remedy For Period Pain
By Live News India

हिवाळ्यात कोणती Fruits खावीत ?

थंडीत सफरचंद, संत्री, पेरू, डाळिंब, किवी अशी fruits उत्तम मानली जातात. ही फळे व्हिटॅमिन-‘सी’ ने समृद्ध असून रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि हिवाळ्यात शरीराला आवश्यक उब व ऊर्जा देतात.

फळविशेष गुणधर्मआरोग्यास होणारे फायदे
सफरचंदफायबर आणि अँटिऑक्सिडंट्सपचन सुधारते, रोगप्रतिकारक शक्ती वाढवते
संत्रीव्हिटॅमिन-C ने समृद्धसंसर्गापासून संरक्षण, त्वचेचा चमक सुधारते
पेरूफायबर आणि व्हिटॅमिन-Cसर्दी टाळते, पचनशक्ती वाढवते
डाळिंबअँटिऑक्सिडंट्सरक्तशुद्धी, ऊर्जा वाढवते
किवीपोटॅशियम, व्हिटॅमिन-Cशरीरात उब निर्माण, थकवा दूर करते

हिवाळा हा पोषणाचे भांडार असणाऱ्या फळांचा आनंद घेण्याचा ऋतू आहे. मात्र प्रत्येक ऋतूला योग्य अशी फळे निवडणे आवश्यक असते. थंड प्रकृतीची फळे जसे की अननस, केळी, खरबूज, कलिंगड आणि द्राक्षे हिवाळ्यात टाळावीत किंवा मर्यादित प्रमाणात खावीत, तर व्हिटॅमिन-C आणि ऊर्जा देणारी फळे जसे सफरचंद, संत्री, पेरू, डाळिंब आणि किवी हा सर्वोत्तम पर्याय ठरतात.


Explore All Categories ⬇️

LATEST UPDATES
Immunity Boosting Ladoo Recipe | स्वादिष्ट आणि पौष्टिक घरगुती लाडू एकच काढा, चार उपाय! Home Remedy For Period Pain
Immunity Boosting Ladoo Recipe | स्वादिष्ट आणि पौष्टिक घरगुती लाडू एकच काढा, चार उपाय! Home Remedy For Period Pain