जनतेशी थेट संवाद आणि देवदर्शनातून विकासाचा संकल्प..
प्रतिनिधी (ता.6) :- प्रभाग क्र. 15 केशवनगर परिसरात काँग्रेस उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. जनतेशी थेट संवाद साधत, विकासाचा ठाम संकल्प आणि कार्यकर्त्यांच्या जोशात ही प्रचार रॅली आयोजित करण्यात आली होती.

या प्रचार रॅलीची सुरुवात केशवनगर येथील श्री गजानन महाराज मंदिरात दर्शन घेऊन करण्यात आली. यावेळी प्रभाग १५ चे अधिकृत उमेदवार वैभव चंद्रजीत भंडारी यांच्यासह सविता गौतम जाधव, सुनीता गणेश काकडे, प्रसाद सुभाष कोद्रे उपस्थित होते. तसेच मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक रॅलीत सहभागी झाले होते.
यानंतर विठ्ठल-रुख्मिणी मंदिर, रेणुका माता मंदिर, मांजराई देवी मंदिर, महादेव नगर येथील महादेव मंदिर तसेच श्रीकृपा टेम्पल येथे दर्शन घेण्यात आले. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

रॅलीदरम्यान प्रत्येक ठिकाणी नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद, प्रेम व आशीर्वाद लाभले. ही रॅली केवळ प्रचारापुरती मर्यादित नसून नागरिकांच्या प्रश्नांना समजून घेणारी, विकासाचा विश्वास देणारी आणि जबाबदारीची जाणीव करून देणारी वाटचाल ठरली. शब्द नाहीत, काम बोलेल आणि जनतेच्या साथीने विकासाचा विजय निश्चित करू, असा विश्वास यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला.
