लेक लाडकी योजना post

कोणाला मिळणार लाभ याबाबत

लेक लाडकी योजनाअंतर्गत पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटुंबात दिनांक 1 एप्रिल 2023 वा तदनंतर मुलीच्या जन्मानंतर 5 हजार रूपये,इयत्ता पहिलीत 6 हजार रूपये.सहावीत 7 हजार रूपये,अकरावीत 8 हजार रूपये तर मुलीचे वय 18 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिला 75 हजार रूपये याप्रमाणे एकूण रूपये 1,01,000/-एवढी रक्कम पाच हप्त्यात देण्यात येईल.

अटी व शर्ती

  • 1.ही योजना पिवळ्या व केशरी शिधापत्रिकाधारक कुटूंबामध्ये दिनांक 1 एप्रिल 2023 रोजी वा त्यांनतर जन्माला येणा-या एक अथवा दोन मुलींना लागू राहील.तसेच एक मुलगा व एक मुलगी असल्यास मुलीला लागु राहील.
  1. पहिल्या अपत्याच्या तिस-या हप्त्यासाठी व दुस-या अपत्याच्या दुस-या हप्त्यासाठी अर्ज सादर करतेवेळी माता-पित्याने कुटुंब नियोजन प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
  • 3.तसेच दुस-या प्रसूतीच्या वेळी जुळी अपत्ये जन्माला आल्यास एक मुलगी किंवा दोन्ही मुलींना या योजनेचा लाभ अनुज्ञेय राहील.मात्र त्यांनतर माता /पित्याने कुटूंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • 4.दिनांक 1 एप्रिल 2023 पूर्वी एक मुलगी/मुलगा आहे व त्यांनतर जन्माला आलेल्या दुस-या  मुलीस किंवा जुळ्या मुलींना (स्वतंत्र)ही योजना अनुज्ञेय राहील.मात्र पाता /पित्याने कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करणे आवश्यक राहील.
  • 5.लाभार्थींचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असणे आवश्यक लाहील.
  1. लाभार्थी बॅंक खाते महाराष्ट्र राज्यात असणे आवश्यक आहे.
  • 7.लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रक्कम रू.1.00 लक्ष पेक्षा जास्त नसावे.

आवश्यक कागदपत्रे

  • 1.लाभार्थीचा जन्माचा दाखला
  • 2.कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला(वार्षिक उत्पन्न 1 लाखापेक्षा जास्त नसावे)याबाबत तहसिलदार/सक्षम अधिकारी यांचा दाखला आवश्यक राहील.
  • 3.लाभार्थी आधार कार्ड
  • 4.पालकांचे आधार कार्ड
  • 5.बॅंक पासबुकच्या पहिल्या पानाची  झेरॅाक्स व CKYC झालेबाबत बॅकेचा दाखला(बॅक खाते आधार कार्डशी संलग्न)
  • 6.रेशन कार्ड पिवळे किंवा केशरी साक्षांकित प्रत
  • 7.मतदान ओळखपत्र(शेवटच्या लाभाकरिता 18 वर्ष पूर्ण झाल्यांनतर मुलीचे मतदार यादीत नाव असल्याचा दाखला)
  • 8.संबंधित टप्प्यावरील लाभाकरिता शिक्षण घेत असल्याबाबतचा संबंधित शाळेचा दाखला(Bonafied)
  • 9.कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया प्रमाणपत्र
  • 10.अंतिम लाभाकरिता मुलीचा विवाह झालेला नसणे आवश्यक राहील.(अविवाहीत असल्याबाबत लाभार्थींचे स्वयं घोषणापत्र)
  • 11.लाभार्थीचे कुटुंब महाराष्ट्र राज्याचे रहिवाशी असलेबाबतचा दाखला
  • 12.लाभार्थीचा व आईचा संयुक्त फोटो

लेक लाडकी योजनेचा लाभ घेण्याची कार्यपध्दती

.क्र.निर्देशांक
1मुलीच्या पालकांनी अंगणवाडी सेविकेकेडे अर्ज सादर करणे-(सदर योजनेअंतर्गत लाभासाठी मुलीच्या पालकांनी 1 एप्रिल 2023 रोजी वा तदनंतर मुलीचा जन्म झाल्यानंतर संबंधित ग्रांमीण अथवा नागरी क्षेत्रातील संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेत मुलीच्या जन्माची नोंदणी केल्यांनतर त्या क्षेत्रातील अंगणवाडी सेविकेकडे आवश्यक त्या कागदपत्रांसह विहित नमुन्यात अर्ज सादर करावा)
2अंगणवाडी सेविकेने संबंधित लाभार्थ्याकडुन अर्ज परिपुर्ण भरून घ्यावा  पर्यवेक्षिका यांचेकडे सादर करावा(गरजेप्रमाणे लाभार्थ्यास अर्ज भरण्यास मदत करावी आणि सदर अर्ज अंगणवाडी पर्यवेक्षिका यांच्याकडे सादर करावा.)
3अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी अर्जाची तपासणी करून दरमहा बाल विकास प्रकल्प अधिकारी यांचेकडे प्रस्ताव  यादी मंजुरीसाठी सादर करावी.(अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी सदर अर्जाची व प्रमाणंपत्रांची छाननी/तपासणी करून प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच संस्थामधील अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी एकत्रित यादी  जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जिल्हा परिषद यांना मान्यतेसाठी सादर करावी.)
4अंगणवाडी पर्यवेक्षिका/बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी अर्ज प्राप्त झालेनंतर अर्जाची छाननी करून अर्ज अपुर्ण  काही कागदपत्रे नसलेस अर्जदारास लेखी कळविणे(पर्यवेक्षिका/बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून एखादा अर्ज संपूर्ण भरलेला नसल्यास अथवा सर्व प्रमाणपत्रासह सादर केलेला नसल्यास असा अर्ज मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत पूर्तता करण्याकरिता अर्जदारास लेखी कळवावे.त्याप्रमाणे अर्जदाराने 1 महिन्यात कागदपत्रांच्या पूर्ततेसह अर्ज दाखल करावा.काही अपरिहार्य कारणास्तव अर्जदार या मुदतीत अर्ज दाखल करून शकला नाही तर त्यास वाढीव 10 दिवसांची मुदत देण्यात यावी.अशा प्रकारे कमाल 2 महिन्याच्या कालावधीमध्ये सदरच्या अर्जावर कार्यवाही पूर्ण करावी.)
5बाल विकास प्रकल्प अधिकारी/जिल्हा महिला  बाल विकास अधिकारी यांनी अर्जाची  कागदपत्रांची तपासणी करून दरमहा जिल्हा कार्यक्रम अधिकारी यांचेकडे  अपुर्ण अर्जांचा अहवाल तसेच परिपूर्ण प्रस्ताव आनलाईन मंजुरीसाठी सादर करावे.(अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी सदर अर्जाची व प्रमाणंपत्रांची छाननी/तपासणी करून अर्ज प्रकल्प स्तरावर दिलेनंतर  प्रत्येक महिन्याला नागरी व ग्रामीण क्षेत्रातील बाल विकास प्रकल्प अधिकारी यांनी तसेच संस्थामधील अनाथ मुलींच्या बाबतीत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांनी आनलाईन प्रस्ताव  जिल्हा कार्यक्रम अधिकारी,जिल्हा परिषद यांना मान्यतेसाठी  वरील कागदपत्रासहं आनलाईन मंजुरीसाठी सादर करावेत.)
6अनाथ मुलींना लाभ मिळण्याबाबत अनाथ प्रमाणपत्र जोडणे-(अनाथ मुलींना लाभ मिळण्याबाबत अर्ज सादर करतांना महिला व बाल विकास विभागाच्या सक्षम प्राधिका-यांकडून देण्यात  आलेले अनाथ प्रमाणपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे.)
7एखादे कुंटुंब आपले राज्यातुन अन्य राज्यातील जिल्ह्यात स्थलांतर झालेनंतर.(एखादे लाभार्थी कुटुंब या योजनेतील एक अथवा काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्यातील अन्य जिल्ह्यात स्थलांतरीत झाले असेल तर पुढील टप्प्यातील लाभ अनुज्ञेय होण्याकरिता त्यांनी स्थलांतर झालेल्या जिल्ह्यातील एकात्मिक बाल विकास सेवा योजनेतील अधिकारी यांचेकडे अर्ज सादर करावा .सदर अर्जाची संबंधित अधिका-यांनी छाननी करून पात्र ठरत असल्यास राज्य कक्षाक़डे शिफारस करावी व राज्य कक्षाकडून अंतिम निर्णय घेण्यात येईल.त्याचप्रमाणे एखादे लाभार्थी कुटुंब या योजनेमधील एक अथवा काही टप्प्यांचा लाभ घेतल्यानंतर राज्याबाहेर स्थलांतरीत झाले असल्यास त्यांनी थेट राज्य कक्षाकडे अर्ज सादर करावा व राज्य कक्ष अंतिम निर्णय घेईल.)

SearchSearch

Recent Posts

एकच काढा, चार उपाय! Home Remedy For Period Pain Aditi Rao Hydari Birthday Special : 5 Best Movies सिर्फ चार दिन है Windows 10 वालो के पास